Home महत्वाच्या बातम्या “भाजप राज्यातच काय देशातही सत्तेत येणार नाही”

“भाजप राज्यातच काय देशातही सत्तेत येणार नाही”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : भाजपने स्वत:च अंधाऱ्या विहिरीत उडी मारली आहे. त्यांचा पक्ष जागतिक स्तरावरचा पक्ष आहे. उद्या ब्रिटनचा पंतप्रधान त्यांचा माणूस होईल, व्हाईट हाऊसमध्ये त्यांचा पंतप्रधान असेल असं ते सांगू शकतात. पण काही झालं तरी महाराष्ट्रात त्यांचा मुख्यमंत्री होणार नाही, असा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला होता. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राऊत यांच्या या दाव्याला पाठिंबा देत भाजपावर निशाणा साधलाय. ते टीव्ही 9 मराठीशी विशेष संवाद साधताना बोलत होते.

शिवसेना नेते संजय राऊत म्हणतात ते बरोबर आहे. राज्यातच काय देशातही भाजप सत्तेत येणार नाही. भाजपला रोखण्यासाठीच महाविकास आघाडी तयार करण्यात आली होती. आता नगरपंचायत निवडणुका झाल्या. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा : औरंगाबाद महापालिका निवडणूक मनसे ताकदीनं लढणार; पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक

दरम्यान, राज्यातील जनतेला महाराष्ट्रातील जनतेने कौल दिला आहे. आम्ही जनतेच्या कौलचा आदर केला आहे. आम्ही स्वतंत्र लढलो होतो. त्यामुळे कार्यकर्त्यांना जर त्या पद्धतीने सूचना केल्या तर स्थानिक कार्यकर्ते एकत्र बसून निर्णय घेतील. सर्व अडचणी दूर होतील. कुठेही गडबड होणार नाही. ज्यांची संख्या जास्त असेल त्यांचा नगराध्यक्ष बसवायचा असा निर्णय आम्ही घेतला आहे. त्यानुसार महाविकास आघाडीचे नेते आणइ कार्यकर्ते कामाला लागले आहेत, असंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

अमृता फडणवीसांनी केलेल्या टीकेवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया, म्हणाले… 

मनसेत पक्षप्रवेशाचं वादळ; हिंगोलीत विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी हाती धरला मनसेचा भगवा झेंडा

औरंगाबादमध्ये ज्या दुकानात पहिल्यांदा वाईन येईल, ते दुकान मी स्वत: फोडणार; इम्तियाज जलील यांचा सरकारला इशारा