Home महाराष्ट्र औरंगाबादमध्ये ज्या दुकानात पहिल्यांदा वाईन येईल, ते दुकान मी स्वत: फोडणार; इम्तियाज...

औरंगाबादमध्ये ज्या दुकानात पहिल्यांदा वाईन येईल, ते दुकान मी स्वत: फोडणार; इम्तियाज जलील यांचा सरकारला इशारा

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

औरंगाबाद : महाराष्ट्रात किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जे सुपर मार्केट एक हजार स्क्वेअर फुटाच्यावर आहे. तिथे एक स्टॉल टाकून वाईन विक्रीला मुभा देण्यात येणार आहे. ठाकरे सरकारच्या या निर्णयावरून एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

या निर्णयाअंतर्गत औरंगाबादमध्ये ज्या दुकानात पहिल्यांदा वाईन येईल, ते दुकान मी स्वतः फोडणार, असा इशारा इम्तियाज जलील यांनी सरकारला दिला.

हे ही वाचा : “अग्रलेखातून राज साहेबांवर टीका करणाऱ्या ‘संजय’ला आता दिव्यदृष्टी प्राप्त झाली आहे का?”

सरकारच्या या नियमानुसार, ज्या दुकानात आधी वाईन येईल, ते दुकानच आम्ही फोडणार. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर मी ही कृती करणार. शेतकऱ्यांसाठी हा निर्णय घेतलाय, असं समर्थन सरकारच्या वतीने करण्यात येतंय. मग चरस आणि गांजाही शेतातच येतात. त्यालाची परवानगी द्या, असंही जलील यांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

एटापल्ली नगरपंचायतीत दोन अपक्षांचा शिवसेनेत प्रवेश; नगरपंचायतीत महाविकास आघाडीची सत्ता येणार?

काँग्रेसचा शिवसेनेला दणका, भिवंडीतील ‘या’ मोठ्या नेत्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी केला काँग्रेसमध्ये प्रवेश

गोव्यासाठी काँग्रेसनं अन् भाजपनं नेमका किती खर्च केला? अमित शाहांनी वाचला पाढा, म्हणाले…