मुंबई : महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर नाशिकजवळील मालेगावमध्ये महापौरांसह काँग्रेसच्या 28 नगरसेवकांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मुंबईमध्ये हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.
काँग्रेसला रामराम ठोकलेल्या नगरसेवकांमध्ये महापौर ताहिरा शेख यांचा देखील समावेश आहे. त्यांच्यासह 28 नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशकेल्यामुळे मालेगाव महानगर पालिकेमध्ये काँग्रेसला मोठं खिंडार पाडलं आहे.
हे ही वाचा : “सामाजिक कार्यकर्ते, मुक्तांगण व्यसनमुक्ती संस्थेचे संस्थापक डाॅ.अनिल अवचट यांचं निधन”
अजित पवार यांनी नव्याने पक्षात दाखल झालेल्या नगरसेवकांना त्यांचे प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिलं. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ हे देखील उपस्थित होते.
दरम्यान, नवाब मलिकांकडे असलेल्या विभागाच्या माध्यमातून राज्यातल्या तरुणांना उभं करण्याचं काम आपण करतो. आपल्या समाजात इतरांच्या तुलनेत शिक्षण कमी आहे. त्यावर कसं काम करता येईल, त्यांना स्वत:च्या पायावर उभं राहण्यासाठी मौलाना आझाद मंडळाच्या माध्यमातून कशी मदत करता येईल, यासाठी काम केलं जात आहे, असं अजित पवार म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
नगरपंचायतीमधील पराभवानंतर गिरीश महाजनांनी खडसेंना डिवचलं; म्हणाले, “ज्याच्यात दम आहे तो…”
ध्वजारोहणावेळी आदित्य ठाकरे व रश्मी ठाकरेंनी आचारसंहितेचा भंग केला- अॅ़ड. जयश्री पाटील
‘…अशा पुड्या सोडण्याची जयंत पाटील यांना सवयच’; चंद्रकांत पाटलांचा टोला