शिवसैनिकांकडून सोमय्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर संजय राऊतांकडून प्रतिक्रिया; म्हणाले…

0
738

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात गंभीर आरोप केले आहेत. संजय राऊत यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी सोमय्या पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जात होते. मात्र पालिकेच्या पायऱ्यांवरच शिवसैनिकांनी निदर्शने करत त्यांचा रस्ता अडवला. त्यामुळे झालेल्या गोंधळात त्यांना धक्काबुक्कीही झाली. त्यामुळे ते खाली पडले. सुरक्षारक्षकांनी प्रसंगावधान राखून तातडीने सोमय्या यांना गाडीत बसविले. सोमय्या यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा : गानकोकिळेची स्वरयात्रा विसावली; भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं निधन

“मराठीचे आणि महाराष्ट्राचे शत्रू आपणच कसे पोसतोय हे आता रोज दिसत आहे. मराठीचा दुस्वास करणारे, महाराष्ट्रातील शाळेत मराठी सक्तीची नको यासाठी उच्च न्यायालयात लढा देणारे भाजपाचे पुढारी किरीट सोमय्या महाराष्ट्राची बदनामी आता रोजच करीत आहेत, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

दरम्यान, 170 आमदारांचा पाठिंबा असलेले ‘ठाकरे’ सरकार या मराठी द्वेष्ट्यांविरुद्ध पाऊल उचलणार नसेल तर मराठी अस्मितेची नवी ठिणगी पडायला वेळ लागणार नाही,” असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“दारूच्या नशेत बंडाचा केंव्हा सय्यद बंडा झाला कळलेच नाही”

“गानकोकिळा लता मंगेशकरांची प्रकृती चिंताजनक, राज ठाकरे यांनी तातडीनं रूग्णालयात घेतली धाव”

किरीट सोमय्यांना ठार मारण्याचाच हेतू होता; चंद्रकांत पाटलांचा गंभीर आरोप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here