अमृता फडणवीसांच्या ‘ट्रॅफिकमुळे घटस्फोट’ विधानावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया; म्हणाले…

0
331

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे आणि ट्राफिकबाबत एक वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याची आता राज्यभरात चर्चा सुरु झालीय. मी रोज सामान्य स्त्री म्हणून घराबाहेर पडते. त्यावेळी मलाही ट्रॅफिक आणि रस्त्यांवरील खड्ड्यांचा त्रास होतो. रस्त्यावर ट्रॅफिक आहे, खड्डे आहेत. ट्रॅफिकमुळे तीन टक्के घटस्फोट होतात. कारण आपण कुटुंबाला वेळ देत नाही, असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं होतं. त्यावर राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी भाष्य केलं आहे.

हे ही वाचा : शिवसैनिकांचा किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला?; किरीट सोमय्या महापालिकेच्या पायऱ्यांवर कोसळले

मला वाटतं कॉमेडी आपण टीव्हीसाठी ठेवू. राजकीय मंडळी म्हणून आपण जे समाजकारण करत असतो, तेच आपण करत राहू”, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. जोगेश्वरी पूर्वच्या पूनम नगरमधील महापालिका शाळेतल्या बास्केटबॉल कोर्टचं उद्घाटन केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते

दरम्यान, याआधी शिवसेनेकडून मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी देखील अमृता फडणवीस यांच्या या विधानावरुन त्यांच्यावर टीका केली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

उदयनराजे भोसले पुन्हा राष्ट्रवादीत जाणार?; अजित पवारांसोबत भेटीनंतर दिलं स्पष्टीकरण, म्हणाले…

उदयनराजे भोसले पुन्हा राष्ट्रवादीत जाणार?; अजित पवारांसोबत भेटीनंतर दिलं स्पष्टीकरण, म्हणाले…

‘…म्हणून मला बाजूला करण्यात आलं’; एकनाथ खडसेंचा फडणवीसांवर हल्लाबोल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here