आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
बीड : बीड जिल्ह्यात पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. यावेळी धनंजय मुंडे यांना काही आंदोलनकर्त्यांचाही सामना करावा लागला.
हे ही वाचा : राज्य सरकार चालविण्याची जबाबदारीही केंद्राकडेच द्या; चंद्रकांत पाटलांचा टोलो
बीडमध्ये नगर परिषदेच्या दोन सफाई कर्मचारी महिलांनी झाडावर चढून आंदोलनाला सुरुवात केली होती. वेतन रखडल्यामुळे त्रस्त झाल्याने संसार कसा करायचा अशी विचारणा करत महिला कर्मचारी आंदोलन करत होत्या. याचवेळी बीडचे आमदार संदीप क्षीरसागरही आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचले. अखेर हे आंदोलन मिटवण्यासाठी संदीप क्षीरसागर हे शिडीच्या सहाय्याने थेट झाडावर चढले आणि आंदोलनकर्त्या महिलांशी चर्चा करण्यास सुरुवात केली.
दरम्यान, त्यांनी विनंती केल्यानंतर आणि सगळ्या शंकांचं निरसन केल्यानंतर अखेर वाद मिटला. यानंतर आंदोलनकर्त्या महिला अखेर झाडावरुन खाली उतरल्या.
महत्वाच्या घडामोडी –
“मुंबई महापालिका निवडणूकीत मनसे-भाजप युती नाही; भाजप स्वबळावर लढणार”
“भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग-हेझल कीच झाले आई-बाबा”
“आमचा मुंबईकरांवर विश्वास आहे, यावेळेस सुद्धा शिवसेनाच बहुमताने महापालिकेत सत्तेत येणार”