Home महाराष्ट्र “मुंबई महापालिका निवडणूकीत मनसे-भाजप युती नाही; भाजप स्वबळावर लढणार”

“मुंबई महापालिका निवडणूकीत मनसे-भाजप युती नाही; भाजप स्वबळावर लढणार”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात मनसे-भाजप युतीच्या चर्चा जोरदार रंगत आहे. अशातच भाजप आणि मनसे मुंबईतील पालिका निवडणुकीत एकत्र लढणार असल्याची माहिती समोर आली होती. तसेच दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याची माहिती पुढे आली होती. मात्र आता भाजप-मनसे युतीच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीची पार्श्वभूमीवर काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत भाजप स्वबळावर लढणार असल्याचं भाजप नेत्यांकडून जाहीर करण्यात आलं. तसेच कालच्या या बैठकीत मनसेला सोबत घेऊन मुंबई महापालिका निवडणूक लढण्यावरही चर्चा झाली.

हे ही वाचा : “भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग-हेझल कीच झाले आई-बाबा”

दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून मनसे आणि भाजपच्या युतीच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र मनसेच्या उत्तर भारतीय विरोधी भूमिकेमुळे भाजपला नुकसान होणार, असं मत काही नेत्यांनी बैठकीत व्यक्त केलं आहे. तसेच मनसेसोबत युती न करण्याच्या मुद्द्यावर भाजपचे एकमत झाले असून स्वबळावर सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

“आमचा मुंबईकरांवर विश्वास आहे, यावेळेस सुद्धा शिवसेनाच बहुमताने महापालिकेत सत्तेत येणार”

सत्तेसाठी शिवसेना ‘लाचारसेना’ झाली; भाजपाची घणाघाती टीका

मोठी बातमी! सोमय्यांना फाईल दाखवणाऱ्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस