आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : जीएसटीच्या परताव्यावरुन राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये अनेकदा आरोप प्रत्यारोप होताना दिसतात. केंद्राकडून जीएसटीचा परतावा वेळेत येत नाही, अशी तक्रार महाविकास आघाडीकडून सतत केली जाते. यावरुन आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
जीएसटीसाठी केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या निधीबाबत महाविकास आघाडीकडून जनतेची दिशाभूल करण्यात येत आहे. प्रत्येक जबाबदारी केंद्रानेच पार पाडायची असेल तर राज्य सरकार चालविण्याचीही जबाबदारी केंद्र सरकारकडेच द्या, असेचंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
हे ही वाचा : “मुंबई महापालिका निवडणूकीत मनसे-भाजप युती नाही; भाजप स्वबळावर लढणार”
भारतीय जनता पार्टीतर्फे पुण्यात कोरोना रुग्णांसाठी सुरू केलेल्या वेगळ्या हेल्पलाईनचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष जगदीश मुळीक आणि आ. माधुरी मिसाळ उपस्थित होते.
दरम्यान, पाच वर्षांपूर्वी जीएसटी लागू झाला त्यावेळी कर संकलनात तूट आली तर ती भरून देण्याचे आश्वासन केंद्र सरकारने सर्व राज्यांना पाच वर्षांसाठी दिले होते. कोरोनाच्या काळात कर संकलन कमालीचे घटले तरीही केंद्र सरकारने वचन पाळले आहे. जीएसटी कॉन्सिलला मदत करून राज्यांना भरपाई देण्यात येत आहे. आता जूनमध्ये पाच वर्षांची मुदत संपल्यानंतरही केंद्राने राज्याला निधी देत रहावे, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग-हेझल कीच झाले आई-बाबा”
“आमचा मुंबईकरांवर विश्वास आहे, यावेळेस सुद्धा शिवसेनाच बहुमताने महापालिकेत सत्तेत येणार”
सत्तेसाठी शिवसेना ‘लाचारसेना’ झाली; भाजपाची घणाघाती टीका