आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
सिंधुदुर्ग : महाराष्ट्रामध्ये ओबीसी असलेल्या नगरपंचायत समित्यांच्या 45 जागांसाठी निवडणुंकांचे निकाल आज जाहीर झाले. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगडमधून केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे पुत्र नितेश राणे यांना धक्का देणारा निकाल समोर आलाय.
हे ही वाचा : भाजप आमदारांना राखता आल्या नाही नगरपंचायती; शिवसेनेच्या 22 वर्षीय तरुणाने मारली बाजी
देवगड नगरपंचायत निवडणुकीमध्ये नितेश राणेंच्या हातून सत्ता गेली असून देवगड नगरपंचायत मध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाली आहे.
भाजपाची सत्ता असणाऱ्या या नगरपंचायतीमध्ये शिवसेनेला आठ व भाजपाला आठ अशा समसमान जागा मिळाल्या आहेत. दोन्ही पक्षांचे प्रत्येकी आठ उमेदवार निवडून आले आहेत. तर राष्ट्रवादीचा एक उमेदवार निवडून आला आहे. त्यामुळे या ठिकाणी नक्की सत्ता कोणाची यावर शिक्कामोर्तब निकाल लागल्यानंतरही झालेलं नाही.
महत्वाच्या घडामोडी –
“सोलापूरमध्येही मनसेचा भगवा फडकला, मनसेच्या रेश्मा सुरेश टेळे नगरसेवकपदी विराजमान”
“आबांच्या मुलानं नगरपंचायत गाजवली, कवठेमहांकाळमध्ये रोहित पाटलांचा दणदणीत विजय”
नंदूरबारमध्ये शिवसेनेचा काँग्रेसला धक्का, 17 पैकी 13 जागांवर बाजी मारत नगरपंचायतीवर झेंडा फडकवला