Home महाराष्ट्र माझी दृष्टी तपासून घ्यायला, माझं नेतृत्व समर्थ आहे, त्यांनी माझी काही काळजी...

माझी दृष्टी तपासून घ्यायला, माझं नेतृत्व समर्थ आहे, त्यांनी माझी काही काळजी करू नये; चंद्रकांत पाटलांचा पलटवार

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यातील शाब्दिक युद्ध सुरूच आहे.  चंद्रकांत पाटील किंवा भाजपाच्या अन्य नेत्यांच्या चष्म्याचा नंबर मला चेक करावा लागेल. अशी टीका संजय राऊत यांनी केली होती.  या टीकेला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

माझी दृष्टी तपासून घ्यायला, माझं नेतृत्व समर्थ आहे. मी ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून प्रेरणा घेऊन सामाजिक, राजकीय काम करतो त्या संघाकडे तर ती उत्तम व्यवस्था आहे, आमचा कान पकडण्याची आम्हाला दुरूस्त करण्याची, संजय राऊत सारख्या माणसाने काल-परवा नशीबाने जे प्रकाशझोतात आलेले आहेत, त्यांच्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार आलं असा त्यांचा दावा आहे. त्यांनी माझी काही काळजी करू नये, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

हे ही वाचा : “शिवसेना नेते गुलाबराव पाटील कोरोना पाॅझिटिव्ह; ट्विट करत दिली माहिती”

महाराष्ट्र नीट चालला आहे की नाही, हे पाहण्यासाठी विविध जिल्ह्यांमधील दहा हजार लोकाचा प्रामाणिक सर्वे घ्या मग ते सांगतील की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकदाही मंत्रालयात आलेले नाहीत, राज्याचे मुख्यमंत्री मागील जवळपास 70 दिवसांपासून कोणालाही उपलब्ध नाहीत, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला आहे.

राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात जवळपास 70 पेक्षा अधिक जणांनी आत्महत्या केलेल्या आहेत. राज्यात विविध परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फुटत आहेत. त्यातून नैराश्य येऊन तरूण मुलांच्या आत्महत्या सुरू आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली नाही, प्रोत्साहन अनुदान, नुकसान भरपाई, विमा अनुदान मिळालेलं नाही म्हणजे महाराष्ट्र चांगला चालला आहे, असं जर असेल तर ठीक आहे, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी – 

प्रश्न विचारणं सोपं असतं, त्याला काही अकलेची गरज लागत नाही; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

“राष्ट्रवादीचा मोठा डाव, पक्षाला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केलेल्या ‘या’ नेत्यानं पुन्हा हाती बांधलं घड्याळ”

“NDTV चे ज्येष्ठ पत्रकार कमाल खान यांचं निधन, वयाच्या 61 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास”