आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
अहमदनगर : राज्यात कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून रूग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. तसेच या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत अनेक राजकीय मंडळींना कोरोनाची लागण झाली आहे.
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे देखील 3 जानेवारी रोजी कोरोना पाॅझिटिव्ह आले. त्यांनी ट्विट करत त्याबद्दलची माहिती दिली होती. त्यानंतर आता रोहित पवार कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनावर मात केल्यानंतर ते पुन्हा एकदा कर्जत नगर पंचायत निवडणुकीच्या मैदानात पहायला मिळाले.
हे ही वाचा : ‘या’ कारणासाठी सांगलीत भाजप खासदार आणि शिवसेना आमदारात संघर्ष
कोरोनामुक्त झाल्यानंतर रोहित पवार यांनी थेट मतदारसंघ गाठला. कर्जत नगर पंचायतीच्या उर्वरित चार जागांच्या निवडणूक प्रचारासाठी ते पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. यावेळी कार्यकर्ते आणि महिलांनी औक्षण करुन रोहित पवारांचं स्वागत केलं. यानंतर रोहित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला.
कोरोनातून बरे होण्यासाठी अनेकांनी प्रार्थना केली होती. त्यामुळे कालच प्राथमिक चाचणी निगेटिव्ह आली. डॉक्टरांनी विश्रांती घ्यायला सांगितली होती. लोकही सांगतात की विश्रांती घ्या. पण निवडणूक आहे. लोकांमध्ये आल्यावर एक वेगळी ऊर्जा मिळते. विधानसभेला कार्यकर्ते माझ्यासाठी पळाले. आता त्यांच्यासाठी लोकांना विनंती करणं माझं काम आहे, असं रोहित पवारांनी यावेळी म्हटलं.
कोरोनातून बरं झाल्यानंतर आज कर्जतमध्ये नगर पंचायत निवडणुकीच्या प्रचारार्थ उतरलो यावेळी प्रभागातील नागरिकांशी संवाद साधला. pic.twitter.com/uFH3n2euck
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 12, 2022
महत्वाच्या घडामोडी –
लोकांनी आयुष्यभर बुस्टर डोस घेत रहायचं का?; काँग्रेसच्या ‘या’ नेत्याचा राज्य सरकारला घरचा आहेर
भाजपच्या नेत्यांना लागलेली ‘ही’ सवय लवकर जाईल; रोहित पवारांचा टोला
…याला म्हणतात कॅप्टन्सी; विराट कोहलीनं शमीमध्ये जोश भरला आणि त्यानंतर शमीनं असं काही केलं की…