माझा अभ्यास तुमच्या इतका नाही, तरीही…; रोहित पवारांचं देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर

0
204

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कर्जत जामखेडचे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यावर रोहित पवारांना कॅलक्युलेशन समजत नाही, त्यांनी अभ्यास करुन बोलावं, अशी टीका केली होती. त्यावर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया देत देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

रोहित पवारांना कॅलक्यूलेशन समजत नाही, त्यांनी अभ्यास करुन बोलावं, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्याची बातमी मी पाहिली. नेहमी अभ्यास करणाऱ्या नेत्याने अभ्यास न करताच माझ्यावर टीका का केली? याचं आश्चर्य वाटलं. पण ठीक आहे, बिहारच्या निवडणुकीत व्यस्त असल्यामुळं अभ्यास करायला त्यांना वेळ मिळाला नसेल म्हणून त्यांनी टीका केली असावी, असा टोला रोहित पवार यांनी फडणवीसांना लगावला.

दरम्यान, अशा प्रकारे रोहित पवार यांनी फेसबुकवर पोस्ट करत देवेंद्र फडणवीसांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

https://www.facebook.com/RRPspeaks/posts/1001795223617553

महत्वाच्या घडामोडी-

अभिनेता सुशांत सिंह राजपूतला ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर

शिवसेनेच्या ‘या’ आमदाराला कोरोनाची लागण; अतिदक्षता विभागात उपचार

बबड्याची सीरिअल पाहण्यापेक्षा विद्यार्थ्यांची अडचण समजून घेतली असती तर…; रोहित पवारांचा आशिष शेलारांना टोला

निलेश राणे यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here