आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्याच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची बैठक काल सह्याद्री अतिथी गृहावर पार पडली.
या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचं आवाहन केलं आहे. यावरून, कोणत्या अधिकारातून शरद पवार यांनी ही बैठक घेतली? मुख्यमंत्रीपदाचा कारभार पवारांकडे देण्यात आलाय का? असा सवाल भाजप नेत्यांनी केला. यावरून शरद पवारांनी प्रत्युत्तर दिलं.
हे ही वाचा : “राष्ट्रवादीचा भाजपला दे धक्का; ‘हा’ मोठा नेता करणार राष्ट्रवादीत प्रवेश”
त्यांच्या ज्ञानाबद्दल मी कौतुक करतो. एखाद्या कामगार संघटनेनं मला किंवा अजून कुणाला बोलावलं तर लोकशाहीत त्यांच्याशी चर्चा करण्याचा त्यांच्या अधिकार आहे की नाही.त्या अधिकाराने त्यांनी चर्चा केली असेल तर त्यात काही वावगं नाही. मुख्यमंत्री हेच महाराष्ट्राचे निर्णय़ घेतात. त्यांची प्रकृती ठीक नव्हती म्हणून प्रत्यक्ष समोर यायला त्यांना मर्यादा होत्या. पण हे जरी असलं तरी परिवहन मंत्र्यांनी जी काही चर्चा झाली ती मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवली असणार. महत्वाचे आणि धोरणात्मक निर्णय हे मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्रीच घेतात, असं शरद पवारांनी यावेळी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण; आयसीयू मध्ये केलं दाखल
टोपेजी, इतकेही निर्बंध लादू नका की, जीवच नकोसा होईल- चंद्रकांत पाटील