आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राज्यात वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नवी नियमावली तयार करत कठोर निर्बंध लागू केले. यामुळे सततच्या लाॅकडाऊनला त्रासाळून पुण्यातील एका तरूणानेे आत्महत्या केली होती. यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावर निशाणा साधत सामान्या जनतेचं आतोनात हाल होत असल्याचा आरोप केला होता. यावरून राजेश टोपे यांनी निर्बंधाबाबत स्पष्टीकरण देत चंद्रकांत पाटलांना टोला लगावला.
हे ही वाचा : शिवसेनेनं फडणवीसांना मुख्यमंत्री करावं, त्यांनी भाजपसोबत जावं- रामदास आठवले
पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकांना काळजी घेण्याचे आवाहन करताना नेहमी ‘जान है तो जहान है’,असे बोलतात. त्यामुळे जीव आहे तर सर्व आहे, चंद्रकांत पाटलांनी हे लक्षात घ्यावे, असं टोपे यांनी म्हटलं होतं. यावरून आता चंद्रकांत पाटलांनी टोपेंच्या वक्तव्याला उत्तर दिलं आहे.
लॉकडाउन, निर्बंध, कठोर निर्बंधांना मी सातत्यानं विरोध केलाय. आरोग्यमंत्री राजेश टोपेजींनी त्यावरून मला पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या ‘जान हैं तो जहाँ है’ या वक्तव्याची आठवण दिलीये. टोपेजी, लक्षात घ्या, इतके निर्बंध लादू नका की जीवच नकोसा होईल, हेच मी सातत्यानं सांगतोय., असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
मोदीजी म्हणाले होते की, प्रत्येक जीव वाचवायला हवा. पण कोरोना रोखण्यात मविआ सरकार अपयशी ठरल्याने कठोर निर्बंधांच्या जात्यात भरडलेले जीव आत्महत्या करताहेत. टोपेजी, राजकारण आणि कुरघोडीचा प्रयत्न सोडा. परिस्थिती समजून जनतेला त्रास होणार नाही, हे बघा !, असंही चंद्रकांत पाटलांनी यावेळी म्हटलं.
मोदीजी म्हणाले होते की, प्रत्येक जीव वाचवायला हवा. पण कोरोना रोखण्यात मविआ सरकार अपयशी ठरल्याने कठोर निर्बंधांच्या जात्यात भरडलेले जीव आत्महत्या करताहेत. टोपेजी, राजकारण आणि कुरघोडीचा प्रयत्न सोडा. परिस्थिती समजून जनतेला त्रास होणार नाही, हे बघा !
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) January 10, 2022
महत्वाच्या घडामोडी –
‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्री रूपाली भोसलेही कोरोना पाॅझिटिव्ह; सध्या झाली क्वारंटाईन”
जयपुरविरुद्ध दिल्लीचा जोरदार पराभव; दिल्लीने चाखली पहिल्यांदाच पराभवाची चव
राजाही वर्क फ्रॉम होम प्रजाही वर्क फ्रॉम होम; चंद्रकांत पाटलांची मुख्यमंत्र्यांवर टीका