भाजपला हरवणे येऱ्या गबाळ्याचे काम नाही, त्यामुळे…; रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य

0
602

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

विरोधकांनी किती प्रचार केला तरी भाजपला हरवणे येऱ्या गबाळ्याचे काम नाही, असं वक्तव्य केंदीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. रामदास आठवले हे कल्याणनजीक गोवेली येथील जीवनदीप कॉलेजमध्ये प्राचार्य धनाजी गुरव यांच्या शोकसभेसाठी आले होते. या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

हे ही वाचा : आम्ही प्रश्न विचारतच राहू, प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही; आशिष शेलारांचा मुख्यमंत्र्यांना टोला

उत्तर प्रदेशात भाजप सोडून गेले त्यांचेच  नुकसान होईल होईल. भाजपला काही फरक पडणार नाही. भाजप 300 जागा जिंकणार. विरोधकांसह अखिलेश यादव यांनी किती प्रचार केला तरी भाजपला हरवणे येऱ्या गबाळ्याचे काम नाही, असं रामदास आठवले म्हणाले आहेत.

दरम्यान, या कार्यक्रमात भाजप आमदार किसन कथोरे, कॉलेज संचालक रविंद्र घोडविंदे आणि रिपाईचे पदाधिकारी उपस्थित होते.

महत्वाच्या घडामोडी – 

ठाण्यात शिवसेना-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्ये बाचाबाची

शिवसेना म्हणजे मराठी माणसाचा श्वास, महाराष्ट्रात मराठी पाट्यांबाबत उलटसुलट चर्चा करणाऱ्यांनी…; शिवसेनेचा घणाघात

नावात राष्ट्रवादी असल्यानं पक्ष राष्ट्रीय होत नाही; देवेंद्र फडणवीसांचा टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here