“जातो माघारी पंढरीनाथा; तुझे दर्शन झाले आता”

0
218

पंढरपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियम आणि निर्बंधांचे पालन करीत 9 मानाच्या पालख्या पंढरीत एकादशी सोहळ्यासाठी दाखल झाल्या होत्या. एकादशी आणि द्वादशीला सर्व संतांनी श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेचे दर्शन घेतले. त्यानंतर संतांच्या पालख्या गावी परतल्या.

प्रमुख 9 पालख्या आणि या पालख्यांबरोबर 20 लोकांना आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरात दाखल होण्याची परवानगी प्रशानसनाने दिली होती. तसेच या सर्वांना कोरोना चाचणी, तोंडावर मास्क, योग्य अंतर आदी आरोग्य विषयक सूचनेचे पालन सक्तीचे होते. विठुरायाच्या दर्शनाची ओढ आणि परंपरा अखंडित रहावी या उद्देशाने सर्व पालख्यांसमवेत आलेल्या भाविकांनी नियमांचे पालन केले.

मंदिर समितीने थर्मल चाचणी, सॅनिटायझरची फवारणी आदी उपाययोजना केल्या होत्या. सर्वप्रथम संत मुक्ताईची पालखी निघाली. तसंच परतीच्या प्रवासाठी जाताना बस फुलांनी सजवली होती. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आदी संतांनी पंढरीचा निरोप घेतला. ‘आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा’ असं म्हणत आणि मंदिराच्या दिशेने हात जोडत हरिनामाच्या जयघोषात पालख्या गावी परतल्या.

दरम्यान, यंदा पोलीस विभागाने सहकार्य केल्याची भावना मुक्ताई संस्थांचे पालखी सोहळा प्रमुख रवींद्र पाटील यांनी बोलून दाखवली.

महत्वाच्या घडामोडी-

हेलिकॉप्टरच्या बाता मारणाऱ्या सरकारने संत निवृत्तीनाथांची पालखी एसटीच्या लाल डब्यातून रवाना केली- अतुल भातखळकर

तिथं मॅप बदललेत, आपण अ‍ॅपवर बंदी घालतोय; जितेंद्र आव्हाडांचा केंद्र सरकारवर निशाणा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ‘ही’ मागणी पंतप्रधानांनी केली मान्य

गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेवर उदयनराजेंच भाष्य; म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here