Home महाराष्ट्र तिथं मॅप बदललेत, आपण अ‍ॅपवर बंदी घालतोय; जितेंद्र आव्हाडांचा केंद्र सरकारवर निशाणा

तिथं मॅप बदललेत, आपण अ‍ॅपवर बंदी घालतोय; जितेंद्र आव्हाडांचा केंद्र सरकारवर निशाणा

मुंबई : भारत-चीन यांच्यात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं सोमवारी TikTok आणि Helo या लोकप्रिय अ‍ॅपसह एकूण 59 अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. यावरून तिथं मॅप बदललेत आपण अ‍ॅपवर बंदी घालतोय; काय पोरकटपणा आहे, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

तिथे मॅप बदलले जात आहेत आणि आपण इथे अ‍ॅपवर बंदी घालतोय. काय पोरकटपणा आहे! कारण आपण वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचे सदस्य आहोत आणि आपण स्वाक्षरी केलेल्या कराराच्या कलम 2 आणि 14 (सी) – 2 या कलमांनुसार ही बंदी शक्य आहे का? कशाला ही धूळफेक?,” असा सवाल आव्हाड यांनी केला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ‘ही’ मागणी पंतप्रधानांनी केली मान्य

गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेवर उदयनराजेंच भाष्य; म्हणाले…

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहकुटुंब पंढरपूरकडे रवाना”

टाळ-मृदुंगाचा गजर; माऊलींच्या जयघोषात मानाच्या 9 पालख्या एस.टी बसने मार्गस्थ; काही तासातच पंढरपुरात पोहोचणार