Home महाराष्ट्र “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहकुटुंब पंढरपूरकडे रवाना”

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहकुटुंब पंढरपूरकडे रवाना”

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहकुटुंब पंढरपूरकडे रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे देखील उपस्थित आहेत. त्यांच्या हस्ते आषाढी एकादशी निमित्त महापूजा केली जाईल.

राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांचा विठूमाऊलीच्या पुजेसाठी विशेष मान असतो. त्यासाठीच उद्धव ठाकरे सहकुटुंब पंढरपूरकडे रवाना झाले आहेत. दुसरीकडे राज्यातील मानाच्या पालख्या देखील पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ आहेत. या पालख्यांचे प्रतिनिधी देखील मुख्यमंत्र्यांसोबत या महापुजेत सहभागी होतील.

आषाढी एकादशी महापूजेसाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येणार असल्याने प्रशासनाकडून मोठी दक्षता घेतली जात आहे. मुख्यमंत्र्यांसमवेत मंदिरात केवळ 9 मानाच्या पालख्यांच्या सोबत आलेल्या व्यक्तींनाच प्रवेश दिला जाणार आहे.

दरम्यान, राज्यभरातील कोरोनाचे संकट आता थेट विठ्ठलाच्या दारात येऊन ठेपले आहे. इतिहासात पहिल्यांदाच विठ्ठल रुक्मिणीची आषाढीची महापुजा अशा पद्धतीने अनेक निर्बंधांसह होत आहे.

महत्वाच्या घडामोडी-

टाळ-मृदुंगाचा गजर; माऊलींच्या जयघोषात मानाच्या 9 पालख्या एस.टी बसने मार्गस्थ; काही तासातच पंढरपुरात पोहोचणार

पृथ्वीराज चव्हाणांचा भाजपवर गंभीर आरोप; नमो अ‍ॅपबद्दल केली मोठी मागणी

भाजपच्या ‘या’ नेत्याने दिला घरचा आहेर; पडळकरांच्या वक्तव्यावरून म्हणाले;…

खुषखबर! “कोरोनावरील पहिली लस भारतात तयार”