आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : सांगोल्याचे शिवसेना आमदार शहाजी पाटील यांनी एका सभेत पक्षाविरोधात नाराजी व्यक्त केली असून, या सरकारमध्ये आमचा कोणी विचार करत नाही, असं म्हणत शिवसेना आमदाराने पक्षाला घरचा आहेर दिला आहे.
हे ही वाचा : मनसेत पक्षप्रवेशाचं वादळ; ठाण्यात अविनाश जाधव यांच्या हस्ते अनेक महिला आणि युवकांचा मनसेत प्रवेश
राज्यातील मंत्रीमंडळात माढा लोकसभा मतदार संघातील एकही मंत्री नाही. आमच्यापैकी कुणालाही मंत्रीमंडळात घेतलं नाही. माझं सोडा शिवसेनेतून मी पहिल्यांदाच निवडून आलोय. त्यामुळे मला आधीच गडबड करायची नाही, लांब बसायचं म्हणून सांगण्यात आलंय. पण 30-30 वर्ष निवडून आलेल्या बबनदादा शिंदे सारख्या लोकांनाही संधी देण्यात येत नाही, असं शहाजी पाटील म्हणाले आहेत.
दरम्यान, आम्हाला नाही वाटत या सरकारमध्ये आम्हाला कोणी विचारतंय, घरची कोंबडी दाळ बरोबर अशी आम्हा सगळ्यांची अवस्था झालीय. गप्प बसायचं नाहीतर गावाकडे जायचं, एवढंच उरलंय,” असंही शहाजी पाटलांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
मराठा आरक्षण पुनर्विचार याचिकांवर होणार ‘या’ दिवशी सुनावणी
आपल्याला रोजी-रोटी बंद करायची नाही पण…; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं जनतेला आवाहन
व्हॉट्सअॅप नोटिफिकेशनमध्ये आता दिसणार…; जाणून घ्या नव्या फिचरबद्दल