सांगली : सांगली जिल्हा पुन्हा एकदा करोनामुक्त झाला आहे. शेवटच्या महिला रुग्णाचा रिपोर्टही निगेटिव्ह आला असल्याने सांगली जिल्ह्यात आता करोनाचा एकही रुग्ण नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली आहे.
विजयनगर, सांगली येथील मृत्यू झालेल्या करोनाबाधित रूग्णाशी संबंधित एकूण 16 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. यामध्ये सदर रूग्णाच्या कुटुंबातील 5 व्यक्ती होत्या. यापैकी आई, वडील, भाऊ व पत्नी यांचे अहवाल निगेटीव्ह आले. सदर व्यक्तीशी संपर्कात आलेले इतर 11 जण क्वारंटाइनमध्ये होते. त्यांचेही रिपोर्ट निगेटिव्ह आहेत.
दरम्यान, करोनाचे एकूण २६ रुग्ण होते. या सर्वांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. यामुले नांदेडनंतर आता सांगली जिल्हा करोनामुक्त झाला आहे. याआधीही सांगली जिल्हा करोनामुक्त झाल्याने सांगली पॅटर्नची राज्यभरात चर्चा झाली होती. पण यानंतर पुन्हा एकदा करोनाचे रुग्ण सापडल्याने धावपळ सुरु झाली होती.
महत्वाच्या घडामोडी-
पालघर घटनेचं राजकारण करू नका; शरद पावारांच आवाहन
…तो पर्यंत महाराष्ट्रात हिंदूंनाच मार खावा लागणार का?; निलेश राणेंचं अनिल देशमुख यांच्यावर टिकास्त्र
सांगलीतील रुग्णाला वाचवता आलं नाही याची खंत- जयंत पाटील
सत्तेची मस्ती आल्यानेच त्यांच्याकडून फालतू आणि निर्लज्ज शब्द येत आहेत- नारायण राणे