Home महाराष्ट्र रमझानच्या कालावधीमध्ये घरातच थांबून नमाज पठणं करा- शरद पवार

रमझानच्या कालावधीमध्ये घरातच थांबून नमाज पठणं करा- शरद पवार

मुंबई : रमझानच्या कालावधीमध्ये घरातच थांबून नमाज पठणं करावं. या कालावधीत सरकारनं कोणतीही सुट दिलेली नाही. सर्वांनी आपल्या घरातच नमाज पठण करावं आणि इफ्तार करावं,” असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून शरद पवार यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

रमझानसाठी आपण आपल्या घरातच नमाज पठाण करू शकता. सरकारकडून रमझानसाठी सुट देण्यात आलेली नाही. अशी परिस्थिती जेव्हा निर्माण होते तेव्हा सहकार्याची आवश्यकता असते. रोजा सोडण्याची जेव्हा वेळ असेल तेव्हा घरातच रोजा सोडा, असं शरद पवार म्हणाले.

दरम्यान, पालघरच्या घटनेचं राजकारण करू नका, असं आवाहनही  शरद पवार यांनी केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

सांगलीकरांनी पुन्हा करुन दाखवलं, सांगली जिल्हा करोनामुक्त

…तो पर्यंत महाराष्ट्रात हिंदूंनाच मार खावा लागणार का?; निलेश राणेंचं अनिल देशमुख यांच्यावर टिकास्त्र

सांगलीतील रुग्णाला वाचवता आलं नाही याची खंत- जयंत पाटील

सत्तेची मस्ती आल्यानेच त्यांच्याकडून फालतू आणि निर्लज्ज शब्द येत आहेत- नारायण राणे