Home महाराष्ट्र …मग औरंगाबादकरांवर अन्याय का?; गुंठेवारी प्रश्नावरून मनसे कार्यकर्त्यांचं आक्रमक आंदोलन

…मग औरंगाबादकरांवर अन्याय का?; गुंठेवारी प्रश्नावरून मनसे कार्यकर्त्यांचं आक्रमक आंदोलन

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

औरंगाबाद : नववर्षाच्या मुहू्र्तावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठी घोषणा करत मुंबईकरांना नवीन वर्षाची भेट दिली आहे.

आजारपणानंतर मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदाच फेसबुक लाईव्ह येत मोठी घोषणा केली आहे. मुंबई महापालिका हद्दीतील 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ताकर माफ करत असल्याची मोठी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली. यावरून आता मनसेनं प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा : “मोठी बातमी! शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरीही कोरोनाचा शिरकाव”

शहरातील अनेक भागातील नागरिक गुंठेवारीच्या मालमत्तांमध्ये राहतात. त्यांच्या करात मनपाने अन्यायकारकवाढ केली आहे. मुंबईत 500 चौरस फूट मालमत्ता असणाऱ्या नागरिकांना मालमत्ता करात माफी देण्यात आली, मग औरंगाबादकरांवर अन्याय का?, असा संतप्त सवाल करत मनसे कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केलं.

महत्वाच्या घडामोडी – 

राज्यात लॉकडाऊन लागणार का?; बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली माहिती

नागपूरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; 180 पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे

माझ्यावर होणाऱ्या टीकेला मी शांत घेतोय, तुम्ही निवडणूकीच्या तयारीला लागा; उद्धव ठाकरेंनी दिले आदेश