आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून शिवसेना-भाजप युती होणार का?, अशा चर्चा राज्यात सूरू आहेत. त्यामुळे सेना-भाजप युतीवरून चर्चांना उधाण आलं आहे. अशातच आता शिवसेना नेत्यानं केलेल्या वक्तव्यामुळं पुन्हा एकदा शिवसेना-भाजपच्या युतीच्या चर्चांना उधाण आलं आहे.
हे ही वाचा : “अनाथांची माय हरपली, ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचं दु:खद निधन’
देशभरातले पूल बांधणारे मंत्री म्हणून ख्याती असलेले नितीन गडकरी हेच शिवसेना आणि भाजपमधील युतीचा पूल बांधू शकतात, असं मोठं विधान शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी केलं आहे. अब्दुल सत्तार यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना हे मोठं विधान केलं.य
दरम्यान, यापूर्वीचा इतिहास पाहिला तर नितीन गडकरी यांनी युती करण्याचा निर्णय घेतला आणि उद्धव ठाकरेंनी मान्य केला तर प्रश्नच मिटेल., असंही सत्तार यांनी यावेळी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
आगामी सातारा पालिकेची निवडणूक स्वबळावर लढणार- शिवेंद्रराजे भोसले
शिवसेनेच्या भगव्याला कवटाळून उस्मानाबादेत कट्टर शिवसैनिकाची आत्महत्या; राजकीय वर्तुळात हळहळ
पुणे जिल्हा बँकेवर अजित पवारांचं वर्चस्व; एका जागेवर भाजपचा विजय