वारिस पठाण औरंगजेबाचे वारिस; त्यांना 100 मावळे अडचणीत आणतील-सुधीर मुनगंटीवार

0
365

मुंबई : एमआयएम नेते आमदार वारिस पठाण यांनी वादकग्रस्त वक्तव्य केलं होतं. शनिवारी पत्रकार परिषद घेत त्यांनी वादग्रस्त वक्तव्य मागे घेतलं. पण, त्यांनी माफी मागितलेली नाही. यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी वारिस पठाण यांच्यांवर टिकास्त्र सोडलं आहे.

वारिस पठाण औरंगजेबाचे वारिस झाले असून त्यांना 100 मावळे अडचणीत आणतील, असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

वारिस पठाण यांनी माफी मागितली असती तर बरं झालं असतं. मात्र, जनता त्यांना माफ करणार नाही, असंही सुधीर मुनंगटीवार म्हाणाले.

दरम्यान, आम्ही 15 कोटी शंभरांवर भारी आहोत, असं मी म्हणालो होतो.  मी 100 कोटी म्हणालो नाही, त्यामुळे माझं वक्तव्य हिंदूंविरोधी होतं असं म्हणणं चुकीचं आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे, असं स्पष्टिकरण वारिस पठाणांनी दिलं होतं.

महत्वाच्या घडामोडी-

दोन भाऊ वेगळे झाले तरीही नातं तुटत नाही- चंद्रकांत पाटील

“…तर मी देवेंद्र फडणवीस यांना ‘भाऊ’ म्हणून हाक मारेन”

ठाकरे सरकारचा रिमोट माझ्या हातात नाही- शरद पवार

“माझ्या बापाने रक्त गाळून हा पक्ष उभारला आहे; पक्षाची बदनामी कराला तर गाठ माझ्याशी आहे”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here