…म्हणून मंत्रालयाचा आधीचा पत्ता कृष्णकुंज, आत्ताचा शिवतीर्थ; मनसेचा मुख्यमंत्र्यांना टोला

0
6

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यापासून मंत्रालयात येत नाही, अशी टीका विरोधकांकडून सातत्याने होत असते. कोरोनाच्या कालावधीतही उद्धव ठाकरेंनी घरातून सर्व कारभार सांभाळला, यावरूनही विरोधकांनी जोरदार टीका केली. आता यावरून मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया देत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

हे ही वाचा : भाजपच्या ‘या’ महिला आमदारांची होणार घरवापसी?; जयंत पाटलांची घेतली भेट, चर्चांना उधाण

संदीप देशपांडे यांनी ट्विट करत मंत्रालयाचा फोटो शेअर केला आहे. या टि्वटमध्ये देशपांडे यांनी वर्षांच्या कालावधीत मुख्यमंत्र्यांचं कार्यालय कसं बंद आहे., हे चित्राच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

संदीप देशपांडे यांनी ट्विटमध्ये असं म्हटलं की, म्हणूनच मंत्रालयाचा नवीन पत्ता आधी कृष्णकुंज आणि आता शिवतीर्थ आहे, असा टोला देशपांडे यांनी लगावला. तसेच देशपांडे यांनी टि्वटमध्ये, तीन वर्षांचा कालावधी दाखवला असून कार्यालय बंद असल्यामुळे धूळ बसलेली असल्याचं दाखवलं आहे.

महत्वाच्या घडामोडी – 

अमृता फडणवीस यांचं नवं ट्वीट चर्चेत; फोटो शेअर करत म्हणाल्या…

“शिवसेनेचा काँग्रेसला दणका, ‘या’ नेत्यानं हाती बांधलं शिवबंधन”

“मोठी बातमी! मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात अटक वाॅरंट जारी”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here