गेल्या 4 दिवसात कोकणात काय काय घडलं, ते सर्व अमित शहांना सांगणार- नारायण राणे

0
330

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सिंधुदुर्ग : गेल्या 4 दिवसात कोकणात जो काही राडा झाला त्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना देणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

हे ही वाचा : सिंधदुर्गातील विजयानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

गेल्या चार दिवसात जिल्ह्यात काय काय घडलं याची माहिती अमित शहांना देणार आहे. पोलीस कसे वागले, कोर्टात काय झालं आणि पत्रकारांनी कसे कव्हरेज केलं… जे काही अनुभवायला मिळालं त्याची सर्व माहिती अमित शहांना देणार आहे, असंही राणे म्हणाले.

दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतील यशावरही राणेंनी भाष्य केलं. भाजपची सत्ता आली आहे. माझी नाही. या जिल्ह्यातल्या देवदेवता आणि जनता यांच्या आशीर्वादामुळे ही सत्ता आली आहे. माझे सर्व कार्यकर्ते आणि त्यांच्या सोबत नितेश राणेनं घेतलेली मेहनत, त्याला निलेश राणे आणि जिल्हाध्यक्ष राजन तेली या सगळ्यांनी दिलेली साथ यामुळे हा विजय मिळाला, असं राणे म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी – 

“शिवसेनेचा भाजपला दे धक्का; यवतमाळमधील ‘या’ नेत्यानं असंख्य समर्थकांसह हाती बांधलं शिवबंधन”

काँग्रेस आणि भाजपला ओबीसी आरक्षण मिळू द्यायचं नाही- महादेव जानकर

राज्यातील विरोधी पक्ष भरकटलेला आहे, त्यामुळे…; संजय राऊतांची टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here