Home महत्वाच्या बातम्या “महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांना घोटाळ्यांवरून पुरस्कार दिले पाहिजे”

“महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांना घोटाळ्यांवरून पुरस्कार दिले पाहिजे”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडीमधील मंत्र्यांना घोटाळ्यांवरून पुरस्कार देण्यात येणार आहेत. तसेच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना घोटाळेरत्न पुरस्कार दिले पाहिजेत, अशी टीका भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी लगावला आहे.

गेल्या वर्षभरात आरोग्य खात्यातील परीक्षा घोटाळे गाजले. हजारो उमेदवारांचे अतोनात हाल करून उमेदवारांचे भवितव्य अंधारात ढकलण्याची कर्तबगारी दाखविल्याबद्दल राज्याच्या आरोग्यमंत्र्यांना या सत्कार मालिकेतील पहिला मानाचा ‘घोटाळेरत्न’ हा सर्वोच्च पुरस्कार या मोहिमेअंतर्गत प्रदान करण्यात येणार आहे, असं केशव उपाध्ये म्हणाले आहेत.

हे ही वाचा : जातीयवादी मंत्री धनंजय मुंडे यांची तात्काळ हकालपट्टी करा; रिपब्लिकन विद्यार्थी सेनेची मागणी

राजेश टोपे यांच्या आरोग्य खात्याप्रमाणेच, अन्य अनेक खात्यांतील घोटाळेही उघडकीस येत असल्याने, अशा खातेप्रमुख मंत्र्यांनाही विविध पुरस्कार देण्यात येणार आहेत. यामध्ये घोटाळेभूषण, घोटाळेवैभव, घोटाळेसम्राट अशा पुरस्कारांचा समावेश असून, पहिल्या पुरस्कार सोहळ्याप्रमाणेच या पुरस्कारांचेही सोहळे विविध ठिकाणी साजरे करण्यात येणार आहेत, असंही केशव उपाध्येंनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी – 

 “सर्वसामान्यांना मिळाला दिलासा; पेट्रोलच्या दरात तब्बल ‘इतक्या’ रूपयांनी झाली घट”

केंद्रीय मंत्री नारायण राणेंना पोलिसांची नोटीस; यावरून देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…

“शिवसेनेत इनकमिंग सूरूच; ‘या’ माजी महापाैराच्या पुत्रानं हाती बांधलं शिवबंधन”