आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहकार समृद्धी पॅनेलच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी बोलताना त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला.
हे ही वाचा : “रामदास आठवले म्हणजे आंबेडकर चळवळीला लागलेला कलंक”
बँक ही प्रत्येक जिल्ह्याची अर्थिक नाडी असते. संस्था उभ्या करायला डोकं आणि अक्कल लागते, पण बंद करायला अक्कल लागत नाही. सतीश सावंत ज्यांच्या नेतृत्वाखाली बॅकेत काम करत होते ते काय काय काम सांगत होते, हे सर्वांनाच माहिती आहे, असं म्हणत अजित पवारांनी नारायण राणेंवर निशाणा साधला. यावरून आता भाजप नेते निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज्य सहकारी बँक लुटली, सहकारी साखर कारखाने आजारी पाडून कवडीमोल किंमतीत खरेदी करून स्वतःच्या कुटुंबियांच्या नावे केले. ज्याच नाव लिहून पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या करतात तो माणूस सिंधुदुर्गात येऊन सहकारातील ज्ञान पाजळतो. अजित पवार स्वतःच्या नाकातलं शेंबुड पुसा अगोदर., असा घणाघात निलेश राणेंनी यावेळी केला.
राज्य सहकारी बँक लुटली, सहकारी साखर कारखाने आजारी पाडून कवडीमोल किंमतीत खरेदी करून स्वतःच्या कुटुंबियांच्या नावे केले. ज्याच नाव लिहून पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या करतात तो माणूस सिंधुदुर्गात येऊन सहकारातील ज्ञान पाजळतो. अजित पवार स्वतःच्या नाकातलं शेंबुड पुसा अगोदर.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) December 27, 2021
महत्वाच्या घडामोडी –
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांना शरद पवारांचं उत्तर, म्हणाले…
आधी राज ठाकरेंचा मलम,आता नितीन गडकरींचं बटण चर्चेत; गडकरींनी लावलं कार्यकर्त्याच्या जॅकेटचं बटण
उद्धव ठाकरे आजारी आहेत तोपर्यंत देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करा- रामदास आठवले