आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
बीड : मुख्यमंत्र्यांच्या दिर्घायुष्यासाठी पायी तिरूपतीला निघालेल्या शिवसैनिकाचा वाटेतच मृत्यू झाला आहे. शिवसैनिक सुमंत रूईकर हे उद्दव ठाकरेंना दिर्घायुष्य लाभावे यासाठी पायी तिरूपती बालाजीच्या दर्शनाला निघाले होते. त्यांनी 1100 किलोमीटर पायी जात असताना रस्त्यातच ते आजारी पडले. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. यावरून शिवसेना नेते व नगरविकास मंत्री एकनाथ शिेंदे यांनी प्रतिक्रिया देत रूईकर यांच्या कुटूंबाला धीर दिला आहे.
हे ही वाचा : अजित पवार म्हणाले, संस्था उभ्या करायला डोकं आणि अक्कल लागते; आता नारायण राणे म्हणतात…
शिवसैनिक सुमंत रुईकर यांच्या कुटंबाची संपूर्ण जबाबदारी ठाणे जिल्हा शिवसेनेकडून उचलण्यात येणार असल्याचं एकनाथ शिेंदे म्हणाले. तसेच रुईकर यांच्या कुटुंबीयाना काही कमी पडू दिलं जाणार नाही, असंही शिंदे म्हणाले.
दरम्यान, सुमंत रूईकर यांच्या अचानक जाण्याने कुटुंबावर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एक कट्टर शिवसैनिक म्हणून सुमंत यांची मातोश्रीपर्यंत ओळख होती.
महत्वाच्या घडामोडी –
“उद्धवसाहेब, नवऱ्याने उभं आयुष्य शिवसेनेसाठी दिलं, त्यांच्या माघारी आम्हाला मदतीची गरज”
राणेंच्या अडचणीत वाढ; शिवसैनिकावर हल्ल्याप्रकरणी राणेंच्या कट्टर समर्थकाला अटक
“ज्यांच्या पक्षाची अर्थव्यस्था डबघाईला आली, ते देशाची अर्थव्यस्था कशी मजबूत करतील?”