आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : एक मोठी बातमी समोर येत आहे. महिलांवरील अत्याचाराविरोधात तातडीने कठोर शिक्षा करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या शक्ती कायदा विधेयकाला विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाची मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे आता महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला मोठ्या प्रमाणात आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हे ही वाचा : पवार साहेबांमुळं शिवसेनेनं भाजपला योग्य जागा दाखवली- रूपाली पाटील ठोंबरे
दोन्ही सभागृहात हे विधेयक मंजूर झाल्यामुळे आता हे विधेयक राज्यपालांकडे पाठवलं जाईल. राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर या विधेयकाचं कायद्यात रुपांतर होईल.
दरम्यान, राज्यातील महिला आणि बालकांवरील अत्याचाराच्या घटनांना आळा बसवा, यासाठी तयार करण्यात आलेल्या शक्ती कायद्यात सुधारणा करण्यासाठी संयुक्ती समितीची स्थापना करण्यात आली होती. तसेच या समितीकडून अभ्यास आणि तज्ञांचं मत जाणून घेत योग्य त्या सुधारणा करण्यात आल्या आहेत. तसेच या कायद्यात पुरुषांबरोबरच महिला आणि तृतीयपंथी यांनाही आणलं गेलं आहे.
शक्ती कायद्यातील प्रमुख तरतुदी खालीलप्रमाणे :
बलात्कार प्रकरणात संबंधित गुन्हेगाराला मृत्यूदंड किंवा सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्याची तरतूद या कायद्यात करण्यात आली आहे.
* गुन्हा नोंदवल्यापासून 30 दिवसांच्या आत तपास पूर्ण करावा. जर 30 दिवसात तपास करणे शक्य नसेल तर पोलीस महानिरीक्षक किंवा पोलीस आयुक्तांना 30 दिवसांपर्यंत मुदतवाढ मिळेल.
* लैंगिक गुन्ह्याच्या बाबतीत न्यायालयीन चौकशी 30 दिवसात पूर्ण करण्यात येईल.
* पोलीस तपासाकरिता माहिती पुरवण्यात कसूर केल्याबाबत इंटरनेट किंवा मोबाइल टेलिफोन डाटा पुरवठादार यांना तीन महिन्यांपर्यंत तुरुंगवास किंवा 25 लाख रुपयांचा दंड किंवा दोन्ही शिक्षा देण्यात येतील.
* महिलांना फोन तसेच अन्य डिजिटल माध्यमातून धमकी दिल्याप्रकरणी शिक्षा ठोठावण्यात येईल. ही शिक्षा पुरुष, स्त्री किंवा तृतीयपंथी यांनाही देता येईल.
* लैंगिक गुन्ह्यांसंदर्भात खोटी तक्रार करणे किंवा त्याद्वारे एखाद्या व्यक्तीला जाणूनबुजून त्रास दिल्यास जामीनही मिळणार नाही.
महत्वाच्या घडामोडी –
“…म्हणून राज ठाकरे माझे दैवत; मनसे नेते अविनाश जाधवांकडून भावनिक पोस्ट”
भाजपाला मोठा धक्का; भाजपच्या ‘या’ आमदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश
फुलंब्री नगरपंचायत पोटनिवडणुकीत भाजपला मोठा धक्का; महाविकास आघाडीचा दणदणीत विजय