Home महाराष्ट्र ‘एरवी काही झालं की भाजपच्या महिला नेत्या बोंबलत सुटतात’; शिवसेनेच्या नेत्याची टीका

‘एरवी काही झालं की भाजपच्या महिला नेत्या बोंबलत सुटतात’; शिवसेनेच्या नेत्याची टीका

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनात विविध मुद्द्यांवरून जोरदार वाद रंगला आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांना काही दिवसांपूर्वी धमकी मिळाली होती. आता राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना धमकी मिळाली आहे. यावरून अधिवेशनात चांगलाच गोंधळ होत आहे.

अजय चौधरी यांनी पेडणेकर यांना धमकी मिळाल्याचा मुद्दा उपस्थित करत शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी एक वक्तव्य केलं. या वक्तव्यानं जोरदार गोंधळ झाला आहे.

हे ही वाचा : “आता महिला अत्याचाराला आळा बसणार?; ‘शक्ती विधेयक कायदा’ दोन्ही सभागृहात मंजूर”

भाजपच्या महिला पदाधिकारी एरवी काही झालं की सावित्रींच्या लेकींवर अन्याय झाला म्हणून बोंबलत सुटतात. किशोरी पेडणेकर या सावित्रीच्या लेक नाहीत का?, असा सवाल व्यक्त करत अजय चौधरी यांनी भाजपच्या महिला पदाधिकऱ्यांवर टीका केली.

दरम्यान, चौधरी यांच्या बोंबलत या शब्दावर भाजपनं आक्षेप घेत जोरदार गोंधळ घातला आहे. महिलांचा अपमान करणारे शब्द या सभागृहात कधीच सहन केले जाणार नाहीत, असं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

पवार साहेबांमुळं शिवसेनेनं भाजपला योग्य जागा दाखवली- रूपाली पाटील ठोंबरे

“…म्हणून राज ठाकरे माझे दैवत; मनसे नेते अविनाश जाधवांकडून भावनिक पोस्ट”

भाजपाला मोठा धक्का; भाजपच्या ‘या’ आमदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश