आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत केंद्र सरकारच्या भूमिकेवरून काँग्रेसचे नेते व राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी केंद्र सरकारव टीका केली होती. या टीकेचा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी चांगलाच समाचार घेतला.
राज्यातील प्रत्येक प्रश्न केंद्र सरकारनेच सोडवायचा असेल तर महाविकास आघाडी सरकारने राजीनामा देऊन राज्यात राष्ट्रपती राजवट स्वीकारावी, असं आव्हान चंद्रकांत पाटलांनी अशोक चव्हाणांना दिलं आहे.
हे ही वाचा : भाजपला लाज वाटली पाहिजे, त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याची मागणी
ओबीसी राजकीय आरक्षण गमावण्यास राज्यातील महाविकास आघाडी सरकारची ढिलाई आणि बेपर्वाई कारणीभूत आहे. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी राजकीय आरक्षणासाठी ट्रिपल टेस्ट पूर्ण करणे व त्यासाठी मुळात एम्पिरिकल डेटा गोळा करण्यास सांगितले आहे. असं असताना त्यासाठी महाविकास आघाडीने अजूनही काही प्रभावी पावले टाकलेली नाहीत, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
दरम्यान, मार्च 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतरही आघाडी सरकारने ओबीसींचा इम्पिरिकल डेटा गोळा केला असता तर आतापर्यंत हा प्रश्न सुटला असता. पण आपण काहीही करायचे नाही आणि प्रत्येक बाबतीत केंद्र सरकारवर जबाबदारी ढकलायची असं आघाडी सरकारचे धोरण आहे, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
OBC आरक्षणाच्या मुद्द्यावर, ‘आपण काही करायचं नाही, केंद्राच्या नावानं गळे काढणं थांबवायचं नाही,’ असा प्रकार महाविकास आघाडीनं चालवलाय. या सरकारला जर काहीच करता येत नसेल, तर राष्ट्रपती राजवट स्वीकारावी, सगळाच कारभार केंद्राकडे द्यावा आणि त्यांच्याकडून कामं होण्याची अपेक्षा करावी! pic.twitter.com/oGtWU1WzWJ
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) December 22, 2021
महत्वाच्या घडामोडी –
शिवसेनेला मोठा धक्का; शिवसेनेचा मोठा नेता भाजपच्या वाटेवर? फडणवीसांची घेतली भेट
अजित पवारांना जर मुख्यमंत्री केलं, तर ते 4 दिवसांत राज्य विकतील- गोपीचंद पडळकर
महाविकास आघाडीमध्ये महिलांवरील अन्याय खपवून घेतला जाणार नाही- रूपाली पाटील ठोंबरे