आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
परभणी : राज्यात ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याचे आदेश सुप्रिम कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे राज्य सरकारला मोठा झटका बसलाय, यावरून राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी प्रतिक्रिया देत ठाकरे सरकारवर निशाणा साधत मोठं वक्तव्य केलं आहे.
हे ही वाचा : “जिथे संकट तिथे शिवसेना, हा इतिहास आहे”
सामान्य लोकांना न्याय देण्याची भूमिका आम्ही घेतो. माझे 30-35 आमदार होऊ द्या. ओबीसींची 10 मिनीटात गंमत करून दाखवतो. त्याचबरोबर मराठ्यांना आणि मुस्लिमांना देखील आरक्षण देऊन दाखवतो, असं महादेव जानकर यांनी म्हटलं. गंगाखेडमध्ये ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. त्यात ते बोलत होते.
दरम्यान, हिंदू बी भिकारी आणि मुस्लीम बी भिकारी, पण राज्य चालवणारा तिसराच मालक असतो, असंही जानकरांनी यावेळी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
मुख्यमंत्र्यांवर टीका करताना रावसाहेब दानवेंची जीभ घसरली, म्हणाले…
राष्ट्रवादीची कबर महाराष्ट्र खोदल्याशिवाय राहणार नाही; भाजप नेत्याचा इशारा