आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : बंगळूर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या कन्नड गुंडांचा आम्ही तीव्र निषेध करतो. केंद्रातल्या भाजप सरकारने निवडणुकांच्या अगोदर ‘छत्रपतींचा आशिर्वाद’ असं म्हणत जाहिरातबाजी केली आता मात्र त्यांच्या सरकारला शिवाजी महाराजांचा विसर पडला आहे का?, असा सवाल ज्य सरकारचे सीमाप्रश्न समन्वयक मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे.
कर्नाटकातल्या मुख्यमंत्र्यांनी यात तातडीने लक्ष घालणे गरजेचे आहे. दोषींवर तातडीने कारवाई करावी अन्यथा रोषाला सामोरे जावे लागेल, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.
हे ही वाचा : ओबीसी आरक्षणावरून पंकजा मुंडेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल; म्हणाल्या ‘ही निवडणूक काळी निवडणूक’
महाराष्ट्र एकीकरण समिती आणि सर्व शिवप्रेमींच्या मागे महाराष्ट्र सरकार ठामपणे उभे आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त राज्याचे नाहीतर संपूर्ण भारताचे दैवत आहे. त्यामुळे त्यांच्या पुतळ्याची विटंबना महाराष्ट्र कदापिही सहन करणार नाही, असंही छगन भुजबळ म्हणाले आहेत.
दरम्यान, कर्नाटक सरकारने बेळगाववर हक्क सांगण्यासाठी तिथे अधिवेशनाचा घाट घातलाय. मराठी जनतेवरच्या अन्यायामुळे आपण यशस्वी होऊ असा कर्नाटकचा समज असेल तर त्यांनी तो काढून टाकावा. रस्त्यावरच्या आणि न्यायालयातल्या दोन्ही लढायांत विजय मिळेपर्यंत महाराष्ट्र स्वस्थ बसणार नाही असे त्यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या घडामोडी –
शिवसेना कार्यकर्त्यावर तलवारीनं हल्ला; हल्ल्यामागे राणेंचा हात असल्याचा आरोप
मोठी बातमी! शिवसेना नेते रामदास कदम राजीनामा देणार?; थोड्याच वेळात घोषणेची शक्यता?
राष्ट्रवादीत प्रवेशानंतर रूपाली पाटलांनी मनसेच्या ‘या’ नेत्याला दिला दम, म्हणाल्या…