आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
सातारा : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील अत्यंत महत्वाची समजली जाणारी पाटण नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी शिवसेना,काँग्रेस, भाजप आणि राष्ट्रवादी या पक्षाचे गट समोरासमोर भिडले आहेत.
हे ही वाचा : युतीसाठी महाविकास आघाडी आणि भाजपकडून प्रस्ताव; राज ठाकरेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
राज्यात जरी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची महाविकास आघाडी सरकार जरी एकत्र असलं तरी या निवडणूकीत मात्र शिवसेना, भाजप आणि काँग्रेस या राजकीय पक्षांनी राष्ट्रवादीच्या विरोधात आपले पॅनेल उभे करून पक्षाच्या अधिकृत चिन्हावर लढण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, पाटण नगरपंचायतीवर आपली वर्षानुवर्षे सत्ता असतानाही या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाच्या ‘घड्याळाच्या’ चिन्हावर न लढता पाटणकर गटांतच निवडणूक लढविण्याचा निर्णय सत्ताधारी राष्ट्रवादीच्या पाटणकर गटाने घेतला आहे, त्यामुळे, राष्ट्रवादीचे बहुमत असतानाही पाटण मधून ‘घड्याळ’ गायब झाल्याच्या चर्चेला राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा”
“…म्हणून राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना खडसावलं”; म्हणाले, ‘स्वत:ला राज ठाकरे समजू नका’