आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी ते मोर्चेबांधणी करण्यात व्यस्त असून या दौऱ्यात राज ठाकरे हे पदाधिकाऱ्यांसोबत वैयक्तिक पातळीवर संवाद साधून त्यांची मतं जाणून घेत आहेत. यादरम्यान राज ठाकरे यांनी शाखाध्यांक्षासह प्रमुख पदाधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले आहे.
प्रत्येकाला सोशल मीडियावर लाइव्ह येण्याची घाई झाली आहे. आधी लोकांमध्ये मिसळा आपसातील वाद मिटवून पक्ष संघटना वाढवा, असं राज ठाकरे यांनी शाखाध्यांक्षासह प्रमुख पदाधिकाऱ्यांना म्हटलं आहे.
हे ही वाचा : केंद्र सरकारने महाराष्ट्रातल्या नव्हे तर देशभरातल्या ओबीसींचा नुकसान केलंय; जयंत पाटलांचा भाजपवर हल्लाबोल
दरम्यान, प्रत्येक जण स्वत:ला राज ठाकरे समजून पक्ष माझ्यामुळेच आहे, असा भ्रम तुमच्या मध्ये निर्माण झाला आहे. हा भ्रम सोडा नाहीतर मी जसे तुम्हाला पद देऊ शकतो तर तुमचे पदही काढून घेऊ शकतो, हे विसरू नका, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
रोहित आणि हार्दिक यांच्यासोबत धनंजय मुंडेंचीही तुफान बॅटिंग, म्हणाले…
‘…नाही तर गुन्हा दाखल करू’; शिवसेनेचा भाजप आमदाराला इशारा
“3 महिन्यात 20 हजार बांधकाम कसे पाडणार?; निवडणूकीचा टार्गेट तर पूर्ण करायचं तर नाही ना”