आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : पुण्यात मनसेला मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रदेश उपाध्यक्ष रुपाली पाटील- ठोंबरे यांनी आपल्या सर्वपदासह पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. आता त्यानंतर मनसेच्या आणखी एका मोठ्या नेत्यानं शिवसेना नेत्याची भेट घेतल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
हे ही वाचा : राजसाहेब मी महाराष्ट्र सैनिक म्हणूनच काम करेन, पण…; सुहास दाशरथे यांनी बोलून दाखवली अस्वस्थता
मनसे नेते अभिजित पानसे यांनी शिवसेना नेते व राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची गुप्त भेट घेतली. या बैठकीत राजकीय चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
दरम्यान, त्यामुळे आता रूपाली पाटील यांच्यानंतर आता अभिजित पानसेही मनसेला धक्का देणार का?, असा सवाल आता उपस्थित केला जात आहेे.
महत्वाच्या घडामोडी –
राष्ट्रवादीत पक्ष प्रवेशाचं वारं; रूपाली पाटील यांच्यानंतर ‘या’ नेत्यांनीही बांधले हाती घड्याळ
“मोठी बातमी! ‘या’ निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी एकत्र”
धनंजय मुंडेंनी जगमित्र कारखाना लुटला, मृत माणसांच्या नावांवर पैसे लुटले; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप