आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : ओबीसी आरक्षणावर सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारला मोठा झटका दिलाय. कारण जाहीर झालेल्या निवडणुका स्थगित करायला कोर्टानं नकार दिलाय. निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्याचे आदेश सुप्रिम कोर्टाने दिले आहेत. यावरून आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.
हे ही वाचा : रूपाली पाटील ठोंबरेंच्या राजीनाम्यावर मनसेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका लढवण्याची नामुष्की ओढवली, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
राज्य सरकारनं गेली दोन वर्ष फक्त केंद्राकडे बोटं दाखवली, असं फडणवीस म्हणाले. तसेच या दोन वर्षात महाविकास आघाडी सरकारनं खरंच ओबीसी आरक्षणासाठी प्रयत्न केले असते, इम्पेरीकल डेटा तयार केला असता, तर आज ओबीसी आरक्षण गमावण्याची वेळ आली नसती, असंही फडणवीसांनी यावेळी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
OBC reservation: सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला मोठा झटका; ओबीसी आरक्षणाशिवाय होणार निवडणुका
“मोठी बातमी! उदयनराजे भोसले शरद पवारांच्या भेटीला, राजकीय चर्चांना उधाण”
‘जब हम दो साथ खडे, तो…; रुपाली पाटलांच्या राजीनाम्यानंतर मनसे नगरसेवकाचं ट्विट होतंय व्हायरल