आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे: देशात 2014 पासून हिंदुत्ववाद्यांची सत्ता आहे. हिंदूंची सत्ता नाही. त्यामुळे या हिंदुत्ववाद्यांना सत्तेतून बाहेर काढा. देशात पुन्हा हिंदुंची सत्ता आणा, असं वक्तव्य काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी केलं होतं त्याला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलंय.
हे ही वाचा : “तृणमूल काँग्रेसचा राष्ट्रवादीला मोठा धक्का; ‘हा’ मोठा नेता करणार तृणमूलमध्ये प्रवेश”
‘आपण हिंदू असल्याचे सांगितले असले तरी हिंदू आणि हिंदुत्व असा त्यांचा संभ्रम झाला आहे. ते हिंदू असल्याचे सांगतात तर त्यांनी मोगलांनी हिंदू मंदिरांवर केलेल्या आक्रमणाचा निषेध करावा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या प्रमाणे मंदिरांची पुनर्स्थापना करत आहेत त्याप्रमाणे कार्य करावे, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काशी येथील विश्वनाथ मंदिराच्या परिसरातील भव्य विकास कामांचा लोकार्पण कार्यक्रम मोठ्या स्क्रीनवर पाहण्यासाठी व्यवस्था करण्यात आली होती. पुण्यात हडपसर परिसरात मांजराई देवी मंदिराच्या आवारात या कार्यक्रमात भाग घेतल्यानंतर पाटील पत्रकारांशी बोलत होते.
महत्वाच्या घडामोडी –
ममता बॅनर्जी असो की राहुल गांधी सर्वांना केवळ शरद पवारच एकत्र आणू शकतात- संजय राऊत
ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच प्रश्न सुटत नाही तोपर्यंत…; नाना पटोलेंकडून भूमिका स्पष्ट
भाजप-मनसे युतीबद्दल राज ठाकरे यांचं सूचक वक्तव्य, म्हणाले…