Home महाराष्ट्र “पुण्यातील भाजपच्या दोन नेत्यांनी वक्फच्या जमिनी हडपल्या, लवकरच त्यांना अटक होणार”

“पुण्यातील भाजपच्या दोन नेत्यांनी वक्फच्या जमिनी हडपल्या, लवकरच त्यांना अटक होणार”

मुंबई : पुण्यातील भाजपच्या दोन लोकांनी वक्फच्या जमिनी हडप केल्या आहेत, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. नवाब मलिक मीडियाशी बोलत होते.

हे ही वाचा : सांगलीत शिवसैनिकांनी रूग्णांना मिळवून दिला न्याय, हाॅस्पिटलने फसवणूक केलेली रक्कम दिली परत

सोमय्या तुम्ही मी वक्फ बोर्डाची जमीन हडप केली असे सांगत आहात. मी जमीन हडप केलेली नाही. मात्र आगामी काळात पुण्यातील दोन एफआयआरमध्ये वक्फची जमीन हडप केल्याप्रकरणी भाजपच्या दोन नेत्यांवर एफआयआर दाखल होणार आहे. त्यांना लवकरच अटक होईलच. मात्र राज्यातील वक्फ बोर्डाच्या जमीनी भाजप नेत्यांनी लाटल्या आहेत त्यांना सोडणार नाही, असं नवाब मलिक म्हणाले आहेत.

दरम्यान, आता या नेत्याना ईडी बोलावते का हे पाहणार आहे, असं सूचक वक्तव्य नवाब मलिक यांनी यावेळी केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

सुप्रिया सुळे यांच्या नातेवाईकांवर छापेमारी झाली ती योग्यच होती- नारायण राणे

“…अन्यथा राज्यातील जनता महाविकास आघाडी सरकारला उलथवल्याशिवाय राहणार नाही”

मीही इंग्रजीत प्रश्न विचारला असता पण…; विनायक राऊतांनी नारायण राणेंना डिवचलं