Home जळगाव आगामी महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठं यश मिळणार- गुलाबराव पाटील

आगामी महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठं यश मिळणार- गुलाबराव पाटील

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

जळगाव : येणाऱ्या आगामी महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी मोठं यश मिळवणार, असा दावा शिवसेना नेते व जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

हे ही वाचा : माझी शिफारस नसल्यामुळं शिवेंद्रराजेंना अध्यक्षपद मिळू शकलं नाही; शशिकांत शिंदेंचा टोला

जळगाव जिल्हा बँकेत आमच्या तीन पक्षाच्या महाविकास आघाडीला यश मिळालं आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणुका आम्ही तिन्ही पक्ष महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढणार आहोत, असं गुलाबराव पाटील म्हणाले.

जिल्हा बँकेवर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तीन पक्षाने एकत्रित यश मिळवून महाविकास आघाडीचा झेंडा फडकविला आहे. पुढच्या काळात महानगरपालिकेच्या निवडणुकांना अद्याप दोन वर्षे बाकी आहेत. पण जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद व नगरपालिकेच्या निवडणुका येत्या दोन ते सहा महिन्यात लागणार आहेत. त्यात स्थानिक पातळीवर आम्ही अधिकार दिले आहेत. जिथे जिथे महाविकास आघाडी होईल, तिथे तिथे महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढण्याचे आदेश आम्ही दिले आहेत. जिल्हा बँक निवडणुकीमुळे आमचे बळ वाढलेले आहे, त्यामुळे येत्या जिल्हा परिेषद, नगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडी मोठे यश मिळवणार आहे, असा विश्वासही गुलाबराव पाटलांनी यावेळी व्यक्त केला.

महत्वाच्या घडामोडी –

…तर ओबीसींना आरक्षण परत मिळू शकते; देवेंद्र फडणवीसांनी सांगितला पर्याय

“‘ती’ बाई स्वातंत्र्याला भीक म्हणाली तेव्हा साहित्यिक गप्प का?”

बाळासाहेब ठाकरेंना मरणोत्तर ‘भारतरत्न’ द्या; ‘या’ नेत्याची मागणी