आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : मी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना रोज फोन करतो, पण ते माझा फोन घेत नाहीत, असं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी यावेळी म्हटलं.
पुण्यातील सिम्बॉयसिस कॉलेजमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्युझियम सेंटरला नारायण राणे यांनी भेट दिली. त्यानंतर राणेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या तब्येतीची विचारपूस करता का?, असा प्रश्न राणेंना केला. त्यावर राणेंनी वरील उत्तर दिलं.
हे ही वाचा : मनसेत इनकमिंग सुरूच; बेलापूरातील अनेक नागरिकांचा मनसेत प्रवेश
‘मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या तब्येतीची दररोज विचारपूस करतो. त्यांना फोन करतो. पण ते फोन घेत नाहीत. शिवसेनेच्या ओळखीच्या नेत्यांकडे मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीबाबत विचारणा करत असतो’, असं राणे म्हणाले.
दरम्यान, संसदेच्या हिवाळी अधिवेशन काळात शिवसेना खासदार संजय राऊत भेटतात. त्यावेळेस तुमचे साहेब कसे आहेत? अशी विचारणा मी करत असतो. आमचे साहेब चांगले आहेत, असं संजय राऊत सांगतात, असं नारायण राणेंनी यावेळी सांगितलं.
महत्वाच्या घडामोडी –
उद्धव ठाकरेंमध्ये वाघाचा एकही गुण नाही; सदाभाऊ खोत यांचा घणाघात
राज ठाकरे फुंकणार महापालिका निवडणुकीचे रणशिंग; मनसेचा पुण्यात दोन दिवस मेळावा