आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
नाशिक : नाशिक येथे सुरु असलेल्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी दाखल झालेले ज्येष्ठ पत्रकार तथा लोकसत्ताचे मुख्य संपादक गिरीश कुबेर यांना छत्रपती संभाजी ब्रिगेडच्या काही कार्यकर्त्यांनी काळे फासल्याने खळबळ उडाली. यानंतर आता या घटनेवर राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हे ही वाचा : भाजपाकडून शिवसेनेला खिंडार; शिवसेना नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश
गिरिश कुबेर यांच्यावर शाईफेक करुन त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला गेला. मागील पाच ते सहा महिन्यांपासून त्यांनी केलेल्या लिखाणाची र्चा सुरु होती. कुबेर यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे. ते पुस्तक वाचले आहे. लोकशाहीमध्ये त्यांना तो अधिकार आहे. ते व्यक्त करण्याची भूमिका घेऊ शकतात, असं शरद पवार म्हणाले आहेत.
दरम्यान, या मताला विरोध करणारे दुसरे घटक असू शकतात. या देशामध्ये आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्य स्वीकारलेले आहे. आपल्या मनाविरुद्ध एखाद्या लेखकाने लिहले असेल तर त्याच्यावर हल्ला करणे योग्य नाही. आम्ही या गोष्टीचे समर्थन करणार नाही. ही गोष्ट निंदनीय आहे, असं शरद पवार यांनी म्हटलंय.
महत्वाच्या घडामोडी –
“मुंबई महापालिकेची निवडणूक संपल्यावर महाविकास आघाडी सरकार कोसळेल”
“मनसेचं आता नवं मिशन; 40 हून अधिक समुद्रकिनारे स्वच्छ करणार”
भाजपाचा राष्ट्रवादीला मोठा धक्का; सावली नगरपंचायतच्या नगरसेवकांसह अनेकांचा भाजपात प्रवेश