आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे उद्यापासून महापालिका निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. ते आज सायंकाळी पुण्यात येणार असून, उद्या निवडणुकीची रणनीती आखणार आहे.
हे ही वाचा : “अमोल कोल्हेंना नेमकं दु:ख कशाचं? शिवाजी महाराजांची प्रतिमा नसण्याचं की पेशव्याची असण्याचं?”
राज ठाकरे यांनी उद्या सकाळी 11 वाजता शहर पक्ष कार्यालयात पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. आगामी महापालिका निवडणुकासंदर्भात आजी माजी नगरसेवक, शहरप्रमुख, राज्याचे उपाध्यक्ष, महत्वाच्या कार्यकर्त्यांसोबत ते सविस्तर चर्चा करुन मत जाणून घेतील.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे हे महाराष्ट्रातील सहा विभागांच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यांमध्ये ते सर्वप्रथम मराठवाड्याच्या भेटीला येत आहेत. तसंच राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याचंही नियोजन पूर्ण झाल्याची माहिती मिळाली आहे.
महत्वाच्या घडामोडी –
…त्यामुळे ममता बॅनर्जी कधी रंग बदलतील, पुन्हा मोदींबरोबर जातील काही सांगता येत नाही”
तरूणींना इम्प्रेस करण्यासाठी स्टंटबाजी करणाऱ्या तरूणाची झाली चांगलीच फजिती; पहा व्हिडिओ
जो डर गया, वो मर गया; नवाब मलिकांचा प्रवीण दरेकरांना टोला