आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : ‘आपल्या सगळ्यांचे नेते ज्यांनी लवकरात लवकर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे असे स्वप्न आपण पाहतो आहोत आणि जागेपणी पाहत आहोत. त्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करत आहोत. लोकांचे आशीर्वाद मिळवत आहोत, असे आपले सर्वांचे लाडके नेते माननीय देवेंद्र फडणवीस, असं वक्तव्य पाटील यांनी पुण्यातील कार्यक्रमात केले होतं. यावरुन आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधलाय.
देवेंद्र फडणवीसांना सत्तेची कोणतीही घाई नाही. मात्र चंद्रकांत पाटलांना जास्त घाई झाली आहे. फडणवीसांचे नाव समोर करुन ते बोलत आहेत. मात्र, त्यांना तिथे बसायचे आहे. असं असलं तरी त्यांचे नाव यादीतही नाही, असं म्हणत जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटलांवर खोचक टीका केली आहे.
हे ही वाचा : पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपला धक्का; भाजप नगरसेविका राष्ट्रवादीच्या वाटेकर? मात्र…
आतापर्यंत दोन वर्षात दहा-बारा वेळेस सरकार पडण्याच्या तारखा जाहीर करण्यात आल्या. आता नारायण राणे यांनी असे सांगितले आहे की, मार्चपर्यंत सरकार कोसळणार, मी त्यांचे आभार मानतो कारण तीन महिन्यांची डेडलाईन त्यांनी आम्हाला दिली आहे. म्हणजे भरपूर वेळ दिलेला आहे. त्यामुळे अशा डेडलाईन किती आल्या किती गेल्या तरी जे ज्यावेळी व्हायचं त्यावेळी होणार आहे. कुणी म्हणाले म्हणून होऊ अशा गोष्ठी होऊ शकत नाही आणि जनतेची जोपर्यंत इच्छा आहे, जसे श्रींची इच्छा आहे तोपर्यंत आमचे राज्य सुरू राहणार, असंही जयंत पाटील म्हणाले आहेत.
दरम्यान, पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भाजपच्या भव्य अशा कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हे विधान केलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
देवेंद्र फडणवीसांच्या रडगाण्याशी आम्हांला काही घेणं देणं नाही; विनायक राऊतांचा टोला
राज्यात ओम्रिकाॅनचा शिरकाव, लाॅकडाऊन लागणार का?; आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिलं उत्तर, म्हणाले…
लस नाही तर बस नाही, डोकं आहे पण मेंदू नाही; मनसेचा राज्य सरकारवर हल्लाबोल