आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीनं आपली कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता शिवसेनेनं राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला आहे.
हे ही वाचा : “काँग्रेसची मोठी राजकीय खेळी; गोव्यात भाजप आणि तृणमूलला दिला मोठा धक्का”
तब्बल 25 वर्षानंतर शिवसेनेला रामराम ठोकत सूर्यकांत दळवी यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. मुंबईतील राष्ट्रवादी भवनात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे.
दरम्यान, सुर्यकांत दळवी यांच्या पक्षप्रवेशाने दापोली राष्ट्रवादीची ताकद मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. दळवी यांच्यासोबतच दापोली पंचायत समितीचे माजी सभापती किशोर देसाई, शांताराम पवार, नगराध्यक्ष परवीन शेख, प्रदेश युवा सेना पदाधिकारी ऋषिकेश गुजर आदींसह अनेक शिवसेनेचे नेते राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“लगीनघाई बरी नाही; नवरा-नवरीच्या झालेल्या फजितीचा व्हिडिओ जोरदार व्हायरल; पहा व्हिडिओ”
“शिवेंद्रराजे भोसले भाजपमध्येच आहेत, ते भाजप सोडून गेलेले नाहीत”