Home महाराष्ट्र राज्यातील शाळा 1 डिसेंबरपासून सुरू होणार का?; राजेश टोपेंचं मोठं विधान, म्हणाले…

राज्यातील शाळा 1 डिसेंबरपासून सुरू होणार का?; राजेश टोपेंचं मोठं विधान, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून बंद असलेल्या शाळा आता पुन्हा सुरू होणार आहेत. पहिली ते बारावीपर्यंत ऑफलाईन शाळा 1 डिसेंबरपासून सुरू करणार असल्याचा निर्णय ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाकडून घेण्यात आला. मात्र कोरोनाच्या नवा विषाणू ओम्रिकाॅननं संपूर्ण देशात दहशत निर्माण केली आहे. त्यामुळे राज्यातील शाळा पुन्हा बंद होणार का?, असा प्रश्न सर्वांना पडलेला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया देत शाळा सुरू होणार की बंद यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

हे ही वाचा : महाविकास आघाडीतील आणखी 4 नेत्यांच्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करणार- किरीट सोमय्या

अजून ओमिक्रॉनसंबंधी आपल्या राज्याला अद्याप भीती नाही, कारण त्याची लागण झालेली कुठे दिसत नाही. त्यामुळे एकदम चिंता बाळगण्याची गरज नाही. शाळा ठरल्याप्रमाणे 1 डिसेंबरला सुरु होईल, असं राजेश टोपे म्हणाले. ते माध्यमांशी बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी –

संधी मिळताच राज्यातील जनता आघाडी सरकारला फेकून देईल- चंद्रकांत पाटील

अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना डिवचलं; म्हणाल्या…

आमच्या कामावर अमित शहा समाधानी- चंद्रकांत पाटील