आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : राजकारणात राजकीय भूकंप येण्याची शक्यता आहे. येत्या मार्चपर्यंत महाराष्ट्रात भाजपचे सरकार स्थापन होईल. आता सर्व काही ठीक होईल, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलं होतं. यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली.
हे ही वाचा : “उद्धव ठाकरेच बेस्ट सीएम; मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंना मतदारांची सर्वाधिक पसंती”
त्यांच्या बुद्धीला जे वाटलं ते ते बोलले. आमचं सरकार चालणार आहे हे आमच्या अनेक नेत्यांनी स्पष्ट केलंच आहे, असा उपरोधक टोला अजित पवारांनी राणेंना यावेळी लगावला. अजित पवार यांनी पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
ज्या दिवसापासून सरकार आलंय तेव्हापासून सरकार पडणार असल्याचं ऐकत आहे. पण सरकार चाललंय ना बाबा. कोण काय बोलतंय हे तुम्ही कोट करून सांगता. पण त्यांच्या सदविवेकबुद्धीला जे योग्य वाटतं ते ते बोलत आहेत. आमच्यातील अनेक मान्यवरांनी सरकार चाललं आहे. सरकारला काहीही धोका नाही हे आधीच स्पष्ट केलं आहे, असंही अजित पवार म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
अमल महाडिकांची माघार; कोल्हापुरातून सजेत पाटील बिनविरोध
नारायण राणेंनी आधी मंत्रिपद सांभाळावं, आणि मग…- विनायक राऊत
भाजपचा राष्ट्रवाद बोगस, त्यांना पुन्हा वर्ण व्यवस्था आणायची आहे; नवाब मलिक यांचा आरोप