आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
बीड : ओबीसी आरक्षण आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली.
हे ही वाचा : “पुण्यात मनसेला मोठा धक्का; ‘हा’ मोठा नेता पक्ष सोडण्याची चर्चा”
स्वत:चा दोष दाखवण्यासाठी केंद्राकडे बोट दाखवण्याचं काम राज्य सरकार करतं. ओबीसींचे राजकीय आरक्षण घालवण्याचे पाप या राज्य सरकारनं केलं. जर सगळे दोष केंद्राचे असतील तर राज्य चालवण्यासाठीही केंद्राकडे द्या, असा टोला प्रीतम मुंडे यांनी लगावला. प्रीतम मुंडे आज बीडमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
‘नाचता येईना, अंगण वाकडं’ असं राज्य सरकारचं काम आहे. नव्या गाड्या, बंगल्यांची डागडुजी करण्यासाठी पैसे आहेत. मात्र, संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी पैसे नाहीत. तसेच समाजातील कुठलाही वर्ग या सरकारच्या कामगिरीवर समाधानी नाही, असंही प्रीतम मुंडे म्हणाल्या.
महत्वाच्या घडामोडी –
“महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी पर्यावरण विभागाच्या उपाध्यक्षपदी धनंजय पाटील यांची निवड”
“सांगली जिल्हा बँक निवडणूक निकाल; शिवसेनेचे अजितराव घोरपडे मोठ्या मताधिक्याने विजयी”
“सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुक निकाल; शशिकांत शिंदे-शंभूराज देसाई यांना पराभवाचा धक्का”