आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : एसटीचे राज सरकारमध्ये विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटीतील कर्मचाऱ्यांनी 29 ऑक्टोबरपासून पुकारलेला संप मागे घेण्याचे आवाहन धुडकावल्यानंतर महामंडळाने कर्मचाऱ्यांवर कारवाई सुरू केली. तर कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला भाजपने पाठिंबा दिला असून भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत हे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचं नेतृत्व करत आहेत.
हे ही वाचा : आगामी हातकणंगले लोकसभा निवडणूकीसाठी ‘या’ नेत्याला मिळणार भाजपकडून उमेदवारी?
आंदोलन करणे हा कर्मचाऱ्यांचा अधिकार आहे. पण कुणाच्या संगण्यावरून किंवा भडकवण्यावरून आंदोलन जास्त ताणू नका. उद्या एसटी कर्मचाऱ्यांचंचे नुकसान झाले तर कोणीही नेते तुमच्या मदतीला येणार नाहीत. या आंदोलनाला राजकीय रंग देण्याचा उद्देश नाही. परंतु, राजकारण करण्यासाठी काही लोक भडकवत आहेत, राजकारणासाठी काही लोक कामगारांना उचकवत आहेत. तुमच्या न्याय मागण्याचा अधिकार तुम्हाला आहे. पण कुणाच्या तरी सांगण्यावरून तुम्ही नुकसान करून घेऊ नका, असं सांगतानाच या संपामधून अनेक नेते आपल्या राजकीय पोळ्या भाजत आहेत. राजकीय पोळी भाजा, पण पोळी करपणार नाही याची काळजी घ्या, असा टोला अनिल परब यांनी आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांना लगावला.
दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत आज परिवहन मंत्री अनिल परब यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक झाली या बैठकीनंतर अनिल परब यांनी माध्यमांशी संवाद साधला.
महत्वाच्या घडामोडी –
राष्ट्रवादीचे टायमिंग चुकलं; बहुमत नसतानाही भाजपाने ही निवडणूक बिनविरोध जिंकली
राष्ट्रवादीचे टायमिंग चुकलं; बहुमत नसतानाही भाजपाने ही निवडणूक बिनविरोध जिंकली
‘महाराष्ट्र सरकारने मुस्लिम मोर्चे थांबवले नाहीत तर…; नितेश राणेंचा राज्य सरकारला इशारा